पुणे शहर

कर्वेनगरमध्ये डी मार्ट बाहेर पदपथासह रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतुकीला अडथळा ; वारजे वाहतूक पोलीस कधी कारवाई करणार?

कर्वेनगर : कर्वेनगरमध्ये नव्याने सुरू झालेल्या डीमार्ट मॉल बाहेर रस्त्यावर व पदपथावर मोठ्याप्रमाणावर बेशिस्त पार्किंग केले जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परंतु सुरू असलेल्या या गैर प्रकाराकडे वारजे वाहतूक पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कर्वेनगर उड्डाणपूल काकडे प्लाझा जवळ ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणापासून ते गालींदे पथ कॉर्नरपर्यंत रस्त्यावर आडव्या पद्धतीने चारचाकी वाहने पार्क केली जात असल्याने रस्त्यावर वाहतुकीसाठी अर्धाच भाग शिल्लक राहत आहे. उड्डाण पुलावरून खाली उतरून वाहने वारजेच्या दिशेने वेगाने जात असताना याठिकाणी पार्क केलेली वाहने काढताना मागे घेतली जात असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच डबल पार्किंग मध्येही मोठ्या प्रमाणात वाहने लावली जात आहेत, त्यामुळे या ठिकाणी रस्त्याच्या कडेने समांतर पार्किंग करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

Img 20211218 wa0278
Img 20211218 wa0277

डी मार्टच्या बाहेर बेशिस्त पार्किंगने कहर केला असताना वारजे वाहतूक पोलिसांकडून त्याकडे का लक्ष दिले जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या ठिकाणी रस्त्याबरोबरच पदपथावर गाड्या लावल्या जात आहेत. गालिंदे पथकडे वळताना कॉर्नरवरच वाहने व रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना वाहन चालवताना मनस्ताप सहन करावा लागत आहे, त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर व पदपथावर लावण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे आवश्यक बनले आहे.

सोमवार पासून होणार कारवाई : या संदर्भात वारजे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू शिंदे यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा मॉल नवीन सुरू झाला असून त्यांच्या मॅनेजरला या सुरू असलेल्या बेशिस्त पार्किंगच्या प्रकाराबाबत सूचना देण्यात आली आहे. वॉर्डन नेमून त्यांनी खरेदी साठी येणारी वाहने त्यांच्या पार्किंग मध्ये लावून घ्यावीत अशा सुचना त्यांना दिल्या आहेत. नागरिकांना तूर्तास भुर्दंड नको म्हणुन दंडात्मक कारवाई सुरू केली नाही पण असेच चालू राहिले तर येणाऱ्या उद्याच्या सोमवारपासून पदपथ व रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

Whatsapp image 2021 11 23 at 2. 46. 54 pm
Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये