पुणे शहर

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे पुण्यात निधन

पुणे : रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने मराठी रसिकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. Veteran actor Shrikant Moghe dies in Pune

मोघे यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1929 रोजी किर्लोस्करवाडी येथे झाला. एकेकाळी मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रात चॉकलेट हिरो अशी त्यांची प्रतिमा होती.

रंगभूमीच्या क्षेत्रात सहा दशकांहून अधिक काळ काम केलेल्या मोघे यांना त्यांनी नाटकांमधून केलेल्या कामाने नाव, पैसा आणि प्रसिद्धी दिली. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवरायांची भूमिका साकारणारे शंतनु मोघे हे त्यांचे चिरंजीव तर अभिनेत्री प्रिया मराठे ह्या त्यांच्या सूनबाई होत. श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवास वर आधारित नटरंगी रंगलो हे आत्मचरित्र देखील लिहिले आहे. साठहून अधिक नाटकांमध्ये तर 50 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

लग्नाची बेडी, तुझे आहे तुझं पाशी, आंधळ्यांची शाळा, वाऱ्यावरची वरात, लेकुरे उदंड जाहली, सीमेवरून परत जा आदी नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये