पुणे शहर

दिलीप वेडे पाटील यांच्यासह भाजपच्या चारही उमेदवारांना बावधन खुर्द मधील ग्रामस्थांचा पाठिंबा 

प्रभाग क्रमांक 10 बावधन भुसारी कॉलनी मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, अल्पना वरपे, रुपाली पवार यांच्या प्रचारार्थ सभा 

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 बावधन भुसारी कॉलनी मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, अल्पना वरपे, रुपाली पवार या उमेदवारांच्या प्रचारासाठी बावधन खुर्द मध्ये आयोजित सभेत बावधन खुर्द मधील ग्रामस्थांनी पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचा एकमुखी ठराव यावेळी कऱण्यात आला.ग्रामस्थांच्या वतीने विलास आप्पा वेडेपाटील व निखिल राजाराम वेडेपाटील यांनी या कार्यक्रमाच्या नियोजन व आयोजनात प्रमुख भूमिका बजावली.

भाजप उमेदवार दिलीप वेडे पाटील हे बावधन खुर्द येथील स्थानिक उमेदवार आहेत. म्हणून ग्रामस्थांनी दिलीप वेडे पाटील आणि त्यांच्या पॅनल मधील उमेदवारांना पाठींबा दिला आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक रंगात आली असून पदयात्रा, नागरिकांच्या भेटी गाठी, कोपरा सभा, मेळावा आयोजित करून प्रभाग क्रमांक 10 बावधन भुसारी कॉलनी मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, अल्पना वरपे, रुपाली पवार मतदारां पर्यंत पोहचत असून नागरिकही त्यांना उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत.

Img 20251125 wa01782121520512185783132

दिलीप वेडे पाटील म्हणाले, बावधन खुर्द गावातील कालभैरवनाथ देवस्थान, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान या प्रांगणामध्ये वेडे पाटील कुटुंबीय, करंजावणे कुटुंबीय, कोकाटे कुटुंबीय, तोडकर कुटुंबीय,कांबळे कुटुंबीय, कदम कुटुंबीय तसेच भाडेकरू आणि घरमालक बावधन मधील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापारी वर्ग अशा सर्वच नागरिकांनी मला आणि किरण दगडे पाटील, अल्पना वरपे, रुपाली पवार यांना ठराव करीत एकमुखी जाहीर पाठींबा दिला आहे. आणि विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे.

 दिलीप वेडेपाटील यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट व ठोस आराखडा मांडला. गावातील रस्ते विकासाच्या कामात अडथळा ठरत असलेली जुनी मंदिरे ग्रामस्थांच्या भावना जपत सन्मानपूर्वक स्थलांतरित करण्याबाबत ताबडतोब निर्णय घेण्यात आला असून संबंधित मंदिर त्वरित काढण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. या निर्णयामुळे रस्ते रुंदीकरण व वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.

तसेच गावातील नागरिकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक व सामूहिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज व बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह उभारण्यात येईल, अशी ठाम घोषणा त्यांनी केली. या सांस्कृतिक हॉलमुळे ग्रामस्थांना विविध कार्यक्रमांसाठी स्वतंत्र व सुसज्ज जागा उपलब्ध होणार असून गावातील सामाजिक जीवनाला नवी चालना मिळणार आहे.

मागील निवडणुकीतही या प्रभागात भाजपाचे वर्चस्व राहिले असून, माजी नगरसेवकांमध्ये दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील आणि अल्पना वरपे यांचा समावेश आहे. ग्रामस्थांच्या या जाहीर पाठिंब्यामुळे भाजपाला यंदाही मजबूत स्थितीत आहे .

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये