पुणे शहर
विनोद मोहिते यांची भाजपा ओबीसी आघाडी पुणे शहर सरचिटणीस पदी निवड

पुणे : भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी पुणे शहर सरचिटणीस पदी विनोद मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक दीपक पोटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. दिलेली जबाबदारी पार पाडून पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विनोद मोहिते यांनी निवडीनंतर सांगितले.