कोथरूड मध्ये राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर रिपाइंच तीव्र आंदोलन.. ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी..

पुणे : अभिनेता राहुल सोलापूरकर याने महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरू ठेवली आहे. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्या विरोधात आंदोलन करत सोलापूरकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आज करण्यात आली. कोथरूड मधील सोलापूरकरच्या घरासमोर रिपाइं च्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, शैलेन्द्र चव्हाण, असित गांगुर्डे, महेंद्र कांबळे, मंदार जोशी, बसवराज गायकवाड, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, विरेन साठे, शाम गायकवाड, नीलेश आल्हाट, अक्षय गायकवाड, अविनाश कदम, अविनाश गायकवाड, उमेश कांबळे, आकाश बहुले, अप्पा वाडेकर,खंडू शिंदे, मिना गालटे, कोथरूड अध्यक्ष वसंतराव ओव्हाळ, केशव पौळे, बाळासाहेब खंकाळ, दीपक सगर, गंगाधर ओव्हाळ, दत्ता चव्हाण, अरविंद शिंदे, नीलेश आगळे, उज्वला सर्वगौड, अण्णा लोखंडे, विलास पाटोळे, बी. पी. शेजवळ, पासोटे मामा, शिवाजी कांबळे, बापू गोरे, महादेव खळगे, स्वप्नील जाधव, गोविंद साठे, नीलेश आगळे, रोहित कांबळे,रमेश तेलवडे यांच्यासह रिपाइं चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले, राहुल सोलापूरकर महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. ज्या माणसाने राजर्षी शाहू महाराजांची भूमिका केली त्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत? यांची पूर्णपणे कल्पना आहे, तरीही हा व्यक्ती वादग्रस्त वक्तव्य करत आहे, त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा तत्काल दाखल करून त्याला अटक करावी.
शहराध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले, राहुल सोलापूरकरने केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. महापुरुषांविरुद्ध जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य हा व्यक्ती करत आहे. पोलिस आणि राज्य सरकारने त्याला पाठीशी घालू नये, त्याचे पोलिस संरक्षण त्वरित कमी करावे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पोलिस कोठडीत त्याची रवानगी करावी.


