पुणे शहर

पुणे महापालिकेसाठी २ की ३ चा प्रभाग यावर बुधवारी निर्णय होणार – अजित पवार यांचे सूचक वक्तव्य

पुणे: राज्य सरकारने मुंबई वगळता इतर महापालिकेत तीन प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला काँग्रेससह आघाडीतील काही मंत्र्यांनी विरोध केला आहे. या प्रभाग पद्धतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही विरोध असल्याची चर्चा होती. त्यावर अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वॉर्ड रचनेबाबत आघाडीत वाद होणार नाही. काही काळजी करू नका, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.(Ward 2 or 3 for Pune Municipal Corporation will be decided on Wednesday)

अजित पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. वॉर्ड रचनेबद्दल वाद होणार नाही. काही काळजी करू नका. ज्यांना कोर्टात जायचे ते जाऊ शकतात. यावर येत्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल. कारण आमच्या काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतलीय, असं सांगतानाच पण असल्या विषयात मला रस नाही. मला विकास कामाच्या बाबतीत काय विचारायचे ते विचारा, असले प्रश्न विचारू नका, असं पवार यांनी सांगितलं.

Screenshot 2021 09 20 19 02 53 50

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये