पुणे शहर

वारजे कर्वेनगर महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाचा दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी अभिनव उपक्रम..

कर्वेनगर : महापालिका सहाय्यक आयुक्त वारजे कर्वेनगर कार्यालयाच्या वतीने दिव्यांगांसाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. नागरी समस्या सोडवतानाच वारजे कर्वेनगर सहाय्यक आयुक्त कार्यालयाने आज सामाजिक दायित्व ही पार पाडले. सामाजिक भान जपणारे अधिकारी असतील तर बदल नक्की घडू शकतो हेच आजच्या उपक्रमातून समोर आले.

वारजे कर्वेनगर महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयात नुकतेच रुजू झालेले महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या पुढाकारातून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम राबवला गेला आणि असंख्य दिव्यांग बंधू भगिनींनी, लहान मुलांनी त्याचा लाभ घेतला. दिव्यांगांना सक्षम करणं त्यांना मुख्य प्रवाहात आणणे यासाठी हा उपक्रम राबवल्याचे नायकल यांनी सांगितले.

या शिबिरामध्ये दिव्यांग नागरिकांचे प्राथमिक आरोग्य तपासणी, इ.सी.जी. तपासणी, अस्थिरोग तज्ञांकडून तपासणी करण्यात आली. यासाठी पुणे महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत फिजिशियन, अस्थिरोग तज्ञ, एक्स रे टेक्निशियन व इतर आरोग्य कर्मचारी यांचे पथक उपस्थित होते. १३३ दिव्यांग नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

नवभारत विकास फौंडेशन, भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र, पुणे या संस्थेमार्फत दिव्यांगता मुक्त अभियान अंतर्गत अत्याधुनिक कृत्रिम, मोड्युलर, पाय, हात व कॅलिपर्स दिव्यांगाना या संस्थेमार्फत मोफत बसविले जातात. सदर शिबिरामध्ये तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन दिव्यांगाना कृत्रिम, मोड्युलर, पाय, हात व कॅलिपर्स मोफत बसविणेबाबत ११ दिव्यांग व्यक्तींचे मापन घेण्यात आले. या व्यक्तींना लवकरच मोफत कृत्रिम अवयव बसविण्यात येणार आहेत.

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192

२११ खडकवासला विधानसभा मतदार संघ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली दिव्यांगाना मतदानाबाबत जनजागृती करून त्यांना मतदान प्रक्रीयेबाबत अवगत करण्यात आले. तसेच मतदान करण्याबाबत दिव्यांगांची जनजागृती घेऊन एकत्रित शपथ घेण्यात आली. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी UDID रजिस्ट्रेशन व रोजगाराबाबत माहिती देण्याबाबत एकांश संस्थेमार्फत महेश मिस्त्री यांनी परिश्रम घेतले. सदर मार्गदर्शनाचा ५० दिव्यांगानी लाभ घेतला.

Img 20240302 wa00085472824010282809066

यावेळी पुणे मनपाच्या समाज विकास विभागामार्फत ९६ दिव्यांग व्यक्तींना विविध योजनाची माहिती देण्यात आली. सदर शिबिरासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे, उपायुक्त आशा राऊत, महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी डॉ.तरडे, क्षेत्रिय कार्यालयाच्या ब्रँड अॅम्बेसिडर रुपाली मगर, उपअभियंता दळवी, महेंद्रकर, प्रशासन अधिकारी शिंपी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक खिरीड यांनी मोलाचे प्रयत्न केले.

Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये