नवीन प्रभाग रचना करताना महापालिका आयुक्त निपक्षपातीपणे पुण्याची प्रभाग रचना करणार का ? याबाबत उपस्थित केली जात आहे शंका

पुणे : पुणे महानगरपालिकेने केलेल्या आणि आता रद्द झालेल्या प्रभागतील लोक संख्येच्या गोंधळावारून महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि त्यांच्या बरोबरचे सगळे सहकारी अधिकारी हे राजकीय दबावमध्ये आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून काम केले जात आहे. असल्याचा आरोप उज्ज्वल केसकर यांनी केला आहे.
नवीन प्रभाग रचना करताना महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका निपक्षपातीपणे पुण्याची प्रभाग रचना करू शकतील का नाही या विशेष शंका आहे त्यामुळे पुण्याची प्रभाग रचना नगर विकास विभागातील नगर रचना संचालनालयाकडून करून घ्यावी आणि मग त्याला निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी अशी मागणी केसकर यांनी नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांच्याकडे केली आहे.
पुणे महानगरपालिकेने केलेल्या आणि आता रद्द झालेल्या प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक 41 ते 49 हे हडपसर मतदारसंघांमध्ये येतात त्यांची सरासरी लोकसंख्या 55000 एवढी ठेवण्यात आली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभागाची लोकसंख्या 62000 दहा टक्के कमी जास्त असणे आवश्यक आहे. परंतु हडपसर भागातील सलग प्रभाग 55000 एवढे लोकसंख्येचे ठेवल्यामुळे बाकीचे प्रभाग 67 हजार 68 हजार काही 71000 इतपर्यंत मोठे झाले होते. हे लोकसंख्येनुसार प्रभाग करताना पूर्णपणे पक्षपातीपणा करण्यात आला होता.

राज्य निवडणूक आयोगाने 2017 साली जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गण हरकती सूचना मागवून निश्चित केले होते आणि त्या प्रमाणे निवडणूक घेतल्या होत्या यातील तेवीस गाव महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आल्यानंतर या गटाची आणि गणाची विभागणी करून या गावातील लोकांना लोकप्रतिनिधीत्व मिळणार नाही तर बाहेरचे प्रस्थापित नेते निवडणूक लढवतील आणि या गावातील लोक फक्त मतदान करतील अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोयीची प्रभाग रचना केली गेल्याचा आरोप केसकर यांनी केला आहे.
त्याचप्रमाणे एका विशिष्ट नेत्यासाठी बाणेर येथील प्रभाग क्रमांक 13 हा दोन सदस्य प्रभाग केला होता यात निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचा भंग झाला होता तसेच प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वी याचा नकाशा बाहेर फुटला होता आणि या संदर्भात मेहरबान हायकोर्टामध्ये याचिका देखील दाखल झाली होती. एक ना अनेक अशी कारणे आहेत की त्यामुळे महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका निपक्षपातीपणे पुण्याची प्रभाग रचना करू शकतील का नाही याबाबत विशेष शंका असल्याचे केसकर यांनी म्हंटले आहे.



