पुणे शहर

रघुनाथ कुचिकांवरील बलात्काराचा आरोप; महिला आयोगाने दिले हे आदेश

पुणे : शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोप प्रकरणात महिला आयोगानं मोठं पाऊल उचललं असून शिवाजीनगर पोलिसांना याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पीडित तरुणीनं महिला आयोगाकडे तक्रार अर्ज केला होता. आयोगाच्या कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

राज्य महिला आयोगानं ट्विटद्वारे सांगितलं की, रघुनाथ कुचिक याच्यावर बलात्कार आणि गर्भपाताचा आरोप करणाऱ्या तरुणीचा तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला आहे. या तक्रार अर्जातील तपशीलाचा तपास करुन याबाबत योग्य ती कार्यवाही करावी आणि याचा अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर करावा असे आदेश शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना हे आदेश दिले आहेत. यवत पोलिसांना दिलेल्या आदेशात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, पीडित तरुणीनं आपल्या तक्रार अर्जात आपल्याला तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये