बचत गटातील महिलांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा : चंद्रकांत पाटील, श्री विठ्ठल रुक्मिणी मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवास पाटील यांची सदिच्छा भेट

कर्वेनगर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कर्वेनगर मधील भालेकरनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवास सदिच्छा भेट देत परिसरातील नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
मंडळाचे उत्सव प्रमुख चेतन भालेकर यांनी चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. या प्रसंगी मंडळाचे राजाभाऊ भालेकर, दिलीप जगताप, भगवान चव्हाण, राहुल भालेकर, मंगेश जगताप, गुलाब भुजबळ, बाळासाहेब शिंदे, रामचंद्र वालगुडे, रोहित चव्हाण, अशोक सोमवंशी, बाळासाहेब बडदे, लक्ष्मण दसवडकर, उत्कर्ष दिघे, संजय पाटील, दादा शेख, राजू माळी, विशाल शिंदे, महेश धूमाळ, किरण तांबट, पदाधिकारी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी मंडळाच्या वतीने पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, नवरात्रोत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. बचत गटाच्या माध्यमातूनही महिला प्रगती साधत आहेत. महिला बचत गटासाठी आम्ही मतदार संघात विविध योजना राबवत असून त्याचा महिलांनी लाभ घ्यावा. या प्रसंगी पाटील यांनी उपस्थित लहान मुलांना चॉकलेट देऊन त्यांची मने जिंकली.










