कोथरुड

महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवणाऱ्या कांचन कुंबरे यांची भाजप कोथरूड महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड

कोथरूड : भाजप कोथरूड विधानसभा मतदार संघाची कार्यकारिणी मतदार संघाचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांनी नुकतीच जाहीर केली. या कार्यकारिणीत भाजपा कोथरुड महिला मोर्चा अध्यक्षपदी कांचन रुपेश कुंबरे यांची निवड करण्यात आली आहे.

सातत्याने महिलांसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या कांचन कुंबरे यांची कोथरुड महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड झाल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. या आधी कुंबरे यांनी भाजप पुणे शहर सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. मतदार संघाच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कांचन कुंबरे म्हणाल्या, पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करणारा आहे.

त्या म्हणाल्या, महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आले आहे, त्यामुळे महिला वर्गाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. राबवत असलेल्या उपक्रमांमुळे विविध क्षेत्रातील महिलांशी संपर्क आला असून संवाद निर्माण झाला आहे. या माध्यमातून मतदार संघातील महिला मोर्चा संघटन अधिक बळकट करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

मोदी सरकार हे महिलांचा आत्मसन्मान करणारे सरकार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मतदार संघातील महिलांसाठी विविध योजना सुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या योजना महिलांपर्यंत पोहचवून त्यांची प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. चंद्रकांतदादा पाटील व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनुसार संघटना बळकट करण्यासाठी कार्यक्रम राबवणार असल्याचे कांचन कुंबरे यांनी सांगितले.

Img 20230717 wa0012281294517541507444836162
Img 20230511 wa0002282292294772633607891151

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये