पुणे शहर

औंध येथे नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या प्रयत्नातून महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र विकसित..

औंध – नगरसेविका सौ अर्चना मधुकर मुसळे यांच्या स्थानिक विकास निधी मधून औंध येथील इंदिरा गांधी शाळेचा मैदानावरील स्टेडियमच्या पाठीमागे ज्या ठिकाणी गेल्या 22 वर्षांपासून दररोज कचऱ्याचा प्रचंड ढीग जमत असे ,  तो कचरा डेपो  बंद करून ,  त्या ठिकानी 25 लाख रुपये खर्च करून पुण्यातील पहिले महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र विकसित केले आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे व राष्ट्रीय कुस्तीपटू रणजीत सिद्धू व इतर महिलांच्या उपस्थित करण्यात आले आहे.

याप्रसंगी ॲड मधुकर मुसळे, नगरसेविका अर्चना मुसळे , वस्ताद पै. विकास रानवडे, कुस्तीपटू सिद्धू उर्फ रितू सिद्धू , कौशल्या पुरोहित , मयूर मुंडे , अक्षय सांगळे  ,  मिलिंद कदम , अशोक गायकवाड, सुभाष बिबवे, महाराष्ट्र एकीकरणाचे अध्यक्ष  राम चव्हाण, औंध कुस्ती केन्द्रातील खेलो इंडिया मेडल्स प्राप्त पै.विराज रानवडे, पै.अक्षय गुंजाळ, पै. बाबासाहेब जुनवणे, आदी छोटे मोठे पैलवान व कौशल्या पुरोहित , उषा गायकवाड , यमुना काशीद उपस्थित होते.

यावेळी केंद्राचे प्रशिक्षक व केंद्र चालक व पै. विकास रानवडे  यांनी नगरसेविका अर्चना मुसळे व ॲड मधुकर मुसळे यांना हे प्रशिक्षण केंद्र उभारताना अनेक अडचणी आल्या मात्र त्यावर मात करून  त्यांनी कुठेही न थांबता , उत्कट ध्येयाने हे केंद्र उभारून केलेल्या सामाजिक कार्याबद्दल योगदानाबद्दल आभार व्यक्त केले

Fb img 1647413731457

https://youtu.be/aO6b5KelaS4

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये