बारावीच्या लेखी परीक्षेत अंशतः बदल

पुणे (Pune News) : बारावीच्या लेखी परीक्षेत (12 th Board Exam) अंशतः बदल झाला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी दिली आहे.

पाच आणि सात मार्चला होणारी परीक्षा आता पाच आणि सात एप्रिलला (12th Time Table Changes) होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, यामध्ये बाकीच्या पेपर नियोजनात कोणताही बदल झालेला नाही. तसेच दहावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संगमनेरजवळ चंदनापुरी घाटातील अपघातात प्रश्नपत्रिका नेणारे वाहन आगीत जळुन भस्मसात झाले आहे. यात असणाऱ्या हिंदी आणि मराठीच्या प्रश्नपत्रिका या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षा तोंडावर असताना ही घटना घडली असल्याने बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी बोर्डाने एक बैठक घेत आणि हेच दोन पेपर एक महिना पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या बदलेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी असे आवाहन बोर्डाने केले आहे.



