पुणे शहर

पुण्यातील मंगला चित्रपटगृहाबाहेर तरुणाचा खून; चित्रपट पाहून बाहेर येताच कोयते, तलवारीने हल्ला

पुणे : जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला त्याला संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. नितीन म्हस्के असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. भररस्त्यात खुलेआम गुन्हेगार बिनधास्त गुन्हे करताना दिसत आहे. यावरुन गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे चित्र आहे. पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे.

मयत नितीन याचा आरोपी टोळक्यासोबत जुना वाद होता. याच वादातून टोळक्याने त्याचा काटा काढला. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात चित्रपटगृहाच्या बाहेर मध्यरात्री 1 वाजता ही घटना घडली. नितीन हा चित्रपटगृहात चित्रपट पहायला आला होता. चित्रपट संपल्यानंतर बाहेर येताच 10 ते 12 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर तलवार, लोखंडी गज, काठ्या डोक्यात घालून नितीनवर प्राणघातक हल्ला केला. यात नितीनचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी फरार झाले आहेत.

घटनेची माहिती मिळतात शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींच्या अटकेनंतरच त्यांच्यात नेमका काय वाद होता हे कळेल.

Img 20230803 wa00041486684870724290474
Img 20230511 wa000228129
Img 20230717 wa0012
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये