
पुणे : भारतीय जनता पार्टी प्रभाग १३ तर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू असलेल्या सेवा सप्ताह व १ ऑक्टोबर च्या जेष्ठ नागरिक दिन या दोन्हीचा संगम साधत मोदींच्या जीवनपटावरील प्रदर्शनाचे उद्घाटन व जेष्ठ नागरिकांचा स्टीमर देऊन सन्मान प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सुमारे २०० हून अधिक नागरीकांना स्टीमर्स देण्यात आले.
मोदींचा ७० वा वाढदिवस असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे सर्व निकष पाळून प्रातिनिधीक सुमारे ७० जणांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकात पाटील यांच्या हस्ते मनोहर मंगल कार्यालय येथे करण्यात आला. सदर कार्यक्रमात बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकात पाटील यांनी मोदीजींच्या जीवनावरील प्रदर्शनी मोदींचा जीवनपट उलगडणारी व त्यांचे सामर्थ्य अधोरेखीत करणारी अत्यंत समर्पक असल्याचे सांगितले. तसेच सध्याच्या या करोनाच्या कठीण काळात जेष्ठ नागरीकांची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांचा सन्मान करताना भेट म्हणून स्टीमर ही आरोग्यदायी भेट असल्याचे सांगत आयोजकांचे कौतुक केले. तसेच मोदींच्या सेवावृत्तीचा आपण सर्वांनीच अंगिकार करायला हवा असे आवाहन केले तसेच जेष्ठ नागरिकांसाठी असेलेल्या व येऊ घातलेल्या योजना तसेच त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांचीही माहिती दिली. याबरोबरच अशा प्रकारचे सर्व सुरक्षेचे नियम पाळून जर कार्यक्रमाचे आयोजन केले तर हळूहळू सर्व जनजीवन सुरळीत होईल असा आशावादही व्यक्त केला.
कुलदीप सावळेकरांनी आवर्जून नमूद केले की सदर उपक्रमाला सर्व स्तरातील जेष्ठ नागरिकांचा सन्मानार्थी म्हणून सहभाग केला गेला आहे. वारजे – कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समिती च्या स्विकृत सभासद मीताली सावळेकर यांनी प्रस्तावनेत सांगितले की जेष्ठ नागरीकांचे अनुभव व मार्गदर्शन आपल्या सर्वांसाठीच कायमच खूप मोलाचे असते. जे आपल्यासाठी कायमच पाठीवर शाबासकीचे आणि डोक्यावर आशीर्वादाचे हात घेऊन तयार असतात त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने मिळाली याचा आनंद आहे. आणि आपल्या पंतप्रधान तसेच आमदार या सर्वांच्याच सेवाभावी वृत्तीचा अंगीकार करत उत्तराेत्तर जनहिताची कामे यापुढेही करत राहण्याचाच आमचा प्रयत्न असेल.
सदर कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आमदार मेधा कुलकर्णी, संघटनमंत्री रवी अनासपुरे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे, नगरसेवक शिळीमकर, किरण बारटक्के, पुनीत जोशी, जग्गनाथ कुलकर्णी, प्रशांत हारसुले, अनुराधा एडके, राजेंद्र येडे, राज तांबोळी, शंतनू खिलारे, गौरी करंजकर, माणिक दिक्षीत, संगिता आधवडे, अपर्णा लोणारे, अँड् प्राची बगाटे, जयश्री तलेसरा, अभिजीत मुळे, रूपेश भोसले, निलेश घोडके, शिवाजी शेळके, प्रताप चोरगे, रामदास गावडे, जनार्दन क्षिरसागर, अमोल डांगे, विठ्ठल मानकर, सुनिल होलबोले, निलेश गरूडकर, नेहल शहा, कुणाल तोंडे, श्रीकांत गावडे, वैभव जमदाडे, मुकेश अनिवसे, त्रिगुण रेणावीकर, रमेश पायगुडे, प्रमोद चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कुलदीप सावळेकर व अँड् सौ मीताली कुलदीप सावळेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.



