आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरक्षा किटचे वाटप

कोथरुड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोथरुड विधानसभा मतदार संघाच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रं १३ मधील आरोग्य कोठी सफाई कामगार तसेच अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना सॅनिटायझर ,आर्सनिक अल्बम गोळ्या व मास्क अशा सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन चे पुणे शहराध्यक्ष किशोर कांबळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोथरुड मतदार संघाचे सोशल मिडिया अध्यक्ष वैभव कोठुळे पाटील यांनी केले होते.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष विजय बापू डाकले, कोथरूडचे मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, महिला अध्यक्ष ज्योती सूर्यवंशी, युवक उपाध्यक्ष निलेशजी शिंदे, प्रेमल जैन, संगीता मोहोळ, कैलास मकवान , मधुकर भगत, सचिन माने, आनंद साबळे, शेखर तांबे, मोहित बराटे, अज्जूभाई शेख,अनील मोरे, कल्याण भारस्कर, सुरज खुडे, विश्वजीत गायकवाड, बापू झोंबाडे आदी उपस्थित होते.



