पुण्यात १० सिलेंडरचा स्फोट आणि ५० हून अधिक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी.. चंदननगर हादरले

पुणे- चंदननगर पाण्याच्या टाकीजवळ डॉ. आंबेडकर वसाहत येथील झोपड्यांना बुधवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून पुणे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती आहे.

पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी दिलेल्या माहिती नुसार, चंदननगर येथील डॉ. आंबेडकर वसाहत येथे पहाटे 5 वाजता भीषण आग लागून जवळपास 10 पेक्षा अधिक सिलेंडर फुटले असून त्यामुळे सुमारे 50 च्यावर झोपड्या जळाल्या आहेत.









आगीवर सद्यस्थितीत नियंत्रण मिळवले असून शंभर पेक्षा अधिक सिलेंडर बाहेर काढले आहेत. अद्याप जखमी कोणी नसल्याची प्राथमिक माहिती आहे. घटना स्थळी १५ अग्निशमन वाहने असून स्वतः अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या सह ८० जवान यांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. झोपड्यांमध्ये १०० पेक्षा जास्त सिलेंडर बाहेर काढल्याने पुढील आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे. दुचाकी वाहने ही आगीत जळून खाक झाली आहेत.









