पुणे शहर
सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त बाजीराव जाधव यांचे निधन

पुणे – सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त श्री. बाजीराव बालाजी जाधव यांचे अल्पशा आजाराने काल रात्री उपचारादरम्यान निधन झाले. ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. संजय जाधव यांचे ते वडील होत.
त्यांचे पार्थिव त्यांच्या येरवडा शांती रक्षक सोसायटी येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. येरवडा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. बाजीराव जाधव हे अत्यंत करारी पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह पोलिस दलातील अधिकारी वर्ग व मित्रपरिवार यांना दुःख झाले आहे.







