राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा

आमरावती : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांना पोलिसाला मारहाण प्रकरणात न्यायालयाने तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेबरोबरच त्यांना १५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्या बरोबर आणखी दोन कार्यकर्त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अमरावती येथील आंबादेवी मंदिराजवळ यशोमती ठाकूर यांचे दिनांक २४ मार्च २०१२ रोजी एका पोलिस कर्मचाऱ्याबरोबर वाद झाले होते. त्यावेळी ठाकूर यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार संबधित पोलीस कर्मचाऱ्याने केली होती. त्यानुसार कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण व शासकीय कामात अडथळा या प्रकरणात ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा न्यायालयाने दिली आहे.
ही शिक्षा देण्यात आल्यानंतर ठाकूर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचा जामीन मंजूर झाला असून ठाकूर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात आम्हला नक्की न्याय मिळेल असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.