मनोज जरांगे पाटील यांना यश ; सरकारकडून या मागण्या मान्य..

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषण करत असून त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत, त्यामुळे आरक्षणासाठी दिलेल्या लढ्याला मोठं यश मिळालं असल्याचं म्हणावं लागेल. उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारकडून तोडगा काढण्यात आला असून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य होताना दिसत आहेत. मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. मागण्या मान्य झाल्याने आज रात्री मनोज जरांगे पाटील मुंबई सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईत मोठ्या संख्येने दाखल झालेला मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांना वाढत चाललेला पाठिंबा सरकारला येणाऱ्या काही दिवसात अडचणीचा ठरला असता त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर सरकारला अखेर झुकावं लागलं.

मनोज जरांगेंच्या यांच्या खालील मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत.
- हैदराबाद संस्थानच्या गॅझेटची अंमलबजावणी केली जाणार, याचं सर्व श्रेय फडणवीसांना जाणार
- हैदराबाद गॅझेटबद्दल सरकार लगेच जीआर काढणार
- 1 महिन्यात सातारा गॅझेटियरबाबत अंमलबजावणी केली जाणार
- मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा जीआर काढणार
- 58 लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींवर लावणार
- बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबाला एका आठवड्यात मदत दिली जाणार
- राज्यपालांच्या सहीनं तातडीनं GR काढण्याचं आश्वासन
- शासन मराठा आंदोलकांवरील दंड मागे घेणार
- हैदराबाद गॅझेटचा जीआर अर्ध्या तासात मनोज जरांगेंकडे सोपवला जाणार



