महाराष्ट्र

संघर्षाला कसं सामोरे जायचं हे भुजबळ साहेबांनी शिकवलं : जयंत पाटील

संघर्ष हा कुणाला चुकला नाही. भुजबळ साहेब हे त्यापैकी एक. महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार जनमनात रुजवताना भुजबळ साहेबांना मोठ्या संघर्षातून जावे लागले.  त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातला संघर्षयात्री म्हटले तर वावगे ठरणार नाही. असे गौरोद्गार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना काढले आहेत.

आज जयंत पाटील यांनी छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात पाटील यांनी म्हंटले आहे माझ्या अपघाताचा प्रसंग आजही मला आठवतोय. दोन्ही पाय फ्रॅक्चर असताना भुजबळ साहेब प्रथम भेटायला आले. जयंत येणारा अर्थसंकल्प तुम्हालाच मांडायचा आहे असे ते म्हणाले. त्यांचे हे शब्द मला ऊर्जा देऊन गेले. त्यांच्या धीराने मला झालेला अपघात किरकोळ वाटू लागला.

त्यावेळी मी अर्थसंकल्प तयार केला आणि व्हीलचेअरवर बसून सभागृहात मांडलाही.  त्यांचा स्वभाव सर्वांना कायमच एक आधार दिलासा देणार आहे.  माणसाने संघर्षाला सामोरे कसे जावे हे शिकवणाऱ्या भुजबळ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये