महाराष्ट्र

परळी तालुक्यात पिके वाहून गेल्याने शेतकरी उध्वस्त

परळी : संततधार पावसाने पिके वाहून गेल्याने तालुक्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. सोयाबीन,  मुग, उडीद, कापूस ही पिके वाहून गेली तर अनेक शेतातील बांधही फुटले आहेत. नदीकाठी असणाऱ्या गोठ्यात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी चाराही ओला झाला आहे.

इंजेगाव येथील शेतकरी पांडुरंग कराड यांनी कृषी सहाय्यक यांनी चिखल असल्याने रस्त्यावरून पाहणी केल्याचे व पंचनामे करण्यासाठी महसूलचा कोणताही कर्मचारी अद्याप आला नसल्याचे सांगितले. अगोदर पाऊस पडत नव्हता म्हणून शेतकरी त्रस्त होता. आता तो इतका पडला आहे की, शेतातील सगळंच वाहून गेलं अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

सरकारने त्वरीत पंचनामे करावेत व ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत करावी, अशी मागणी बळीराजा करू लागला आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकरी देशोधडीला लागत आहे. आता किती उत्पादन निघणार असा प्रश्न उपस्थित झाल्याने शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये