पुणे शहर

महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट शिखर संस्थेचा ७५ वा वर्धापनदिन पुण्यात उत्साहात…

वर्धापनदिनानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन

पुणे :  महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट शिखर संस्थेच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे जिल्हा शाखेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ट्रस्टचे विश्वस्त व माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. 75th Anniversary of Maharashtrian Yadav Charity Trust Shikhar Sanstha celebrated in Pune

संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन व चहापान कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्टचे विश्वस्त व माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या उपस्थितीत व पुणे जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश कासार यांच्या अध्यक्षतेखाली उद्यानप्रसाद मंगल कार्यालय, सदाशिव पेठ, येथे करण्यात आले होते. यावेळी उत्साही वातावरणात वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

Img 20210116 wa0007

या प्रसंगी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या ८-१० महिन्यांच्या कालावधीत मृत पावलेल्या सभासद व न्याती बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बाबा धुमाळ  सुरेश कासार,  दत्ताराम महाडीक, अस्मिता दिवेकर यांनी ट्रस्टच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

यावेळी शाखा कार्यकारिणी पदाधिकारी/सदस्य, विभाग पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद उपस्थित होते. ट्रस्टच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सभासदांकरीता आयुष्यमान भारत योजनेविषयी माहिती तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता दाखला, तसेच शैक्षणिक व वैद्यकीय कामासाठी आवश्यक शासकीय दाखले मिळविण्याबाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येईल असे ट्रस्टचे विश्वस्त  प्रदीप धुमाळ यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन दिघे व आभार डॉ. अभिजित महाडीक यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये