महाराष्ट्र

राज्यात एकाच दिवसात 9 हजार 170 नवीन कोरोनाबाधित; मुंबईत सहा हजारांहून अधिक

मुंबई : राज्यात 9 हजार 170 नवीन कोरोनाबाधित आढळल्याचे समोर आले आहे. तर, मुंबईत सहा हजार 347 नव्या कोरोनाबाधितांची काल नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात काल सात कोरोनाबाधित रूग्णांचा तर मुंबईत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के एवढा आहे. राज्यात 6 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण बी जे‍ वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी रिपोर्ट केले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 460 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,91,36,643 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66,87,991 (9.67 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,26,001 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1064 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.35 टक्के एवढे आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये