आरोग्य

Covid 19 : मुंबईत आढळला देशातील पहिला XE उपप्रकारचा करोना रुग्ण

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेल्या एक्सई या करोनाच्या नव्या उपप्रकाराने बाधित असलेला एक रुग्ण मुंबईत आढळला आहे. मुंबई पालिकेने जाहीर केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये हे निदर्शनास आले आहे. भारतातील हा एक्सईचा पहिलाच रुग्ण आहे. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. हा रुग्ण महिनभरापूर्वी म्हणजे 2 मार्चला करोनाबाधित होता. त्याला कोणतीही लक्षणे नव्हती. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 मार्चला करोनामुक्तही झाला. 

चित्रीकरणामध्ये नियमितपणे केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये 2 मार्चला ही रूग्ण महिला बाधित आढळली. तिचे नमुने चाचणीसाठी पाठविले असता एक्सईची बाधा झाल्याचे आढळले आहे. 3 मार्चला दिलेल्या नमुन्यामध्ये ही महिला करोनामुक्त झाल्याचेही आढळले आहे. या महिलेने लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या होत्या आणि ती लक्षणे विरहित होती.

ब्रिटनमध्ये एक्सई हा विषाणूचा उपप्रकार जानेवारीमध्ये आढळला आहे. जगभरात या विषाणूचे 600 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. हा विषाणूत ओमायक्रॉनचे बीए.1 आणि बीए.2 जनुकीय घटकांचे मिश्रिण झाल्याचे आढळले आहे. बीए.1 आणि बीए.2 हे दोन्ही उपप्रकार देशभरात करोनाच्या तिसऱ्या लाटेपासून आढळत आहेत. त्यामुळे यांचेच गुणधर्म असलेल्या नव्या विषाणूपासून सध्या कोणताही धोका आहे असे वाटत नाही. तिसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या बाधित झाल्यामुळे करोनाविरोधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने तरी भारताला विषाणूच्या नव्या प्रकाराचा धोका नाही, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये