पुणे शहर

चित्रा वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष किशोर कांबळे यांची मागणी..

पुणे : रघुनाथ कुचिक प्रकरणातील महिलेला संरक्षण मिळवे व भाजप नेत्या चित्रा वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहरच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

या संदर्भातील निवेदन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे यांच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तांकडे देण्यात आले आहे. यावेळी आनंद सागरे , अमोल जाधव स्वप्निल थोरवे , स्वप्निल जोशी, निलेश रुपटक्के , रोहन पायगुडे, गोविंद जाधव, कुलदीप शर्मा, विनोद सकट, सौरभ गुंजाळ तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.

रघुनाथ कुचिक ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी संबधित महिलेवर चित्रा वाघ यांनी दबाव टाकल्याचा आरोप संबंधीत महिलेने केला आहे. मानसिक दबाव आणून त्या महिलेला कुचिक यांच्या विरोधात स्टेटमेंट देण्यास भाग पाडण्यात आले आहे असे त्या पिडीत महिलेने विविध प्रसार माध्यमांवर सांगितले आहे. तसेच  विशिष्ट यंत्रणा वापरून व्हॉटस् अपचे खोटे मेसेजेस येत आहेत जे कधी त्या महिलेने केले नाहीत याबरोबरच संबंधीत महिलेला गोवा व मुंबई ह्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आले असे महिलेचे म्हणणे आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार भयंकर असून तत्काळ चित्रा वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा  व संबंधीत पिडीतेला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराच्या वतीने करण्यात आली आहे.

१४ व १५ एप्रिलला कर्वेनगर मध्ये कुस्त्यांचा थरार.. हवेली अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तयारीचा आढावा
Fb img 1648963058213
Img 20220413 wa0219

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये