कोथरुड

कोथरूड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे केंद्र सरकार विरोधात महागाई जुमला आंदोलन

पुणे : सातत्याने महागाईत वाढ होत असल्याने जनतेचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे या विरोधात आज पुणे शहर काँग्रेस कमिटी व कोथरूड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारने विरोधात महागाई जुमला आंदोलन करण्यात आले.

कोथरूडमधील कर्वे पुतळा चौकात घेण्यात आलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी महागाई विरोधात निदर्शने करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

यावेळी कोथरुड ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष विजय खळदकर, शिवा मंत्री, आण्णा राऊत, उमेश कंधारे, संदीप मोकाटे, दत्ता जाधव, आण्णा गोसावी, कान्हो साळुंके, शिला राऊत, मनिषा करपे, राजाभाऊ साठे, राजू मगर, राज जाधव, अजित ढोकळे, जीवन चाकणकर, मंगेश निम्हण, शारदा वीर, कुष्णा नाकते, युवराज मदगे प्रताप शिळिमकर संदीप कुदळे, मोहन आवळे, भगवान कडू, दत्ता उभे, बालाजी शिंदे, जगदीश जगताप, शिवाजी भोईटे, मामा गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढलेले असल्याने जीवनावश्यक प्रत्येक वस्तूच्या किंमतीत वाढ झालेली आहे, त्यामुळे सर्व सामान्य जनतेला पोटाला चिमटा काढून जगावे लागत आहे. प्रत्येकवेळी केवळ जुमालेबाजी केली जाते म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन केल्याचे कोथरुड ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष विजय खळदकर यांनी सांगितले.

Img 20220425 wa00102978251768482543832
शरद पवारांची मोदी सरकारवर जहरी टीका पहा पवारांच्या भाषणाचा Uncut video

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये