महाराष्ट्र
राणा दाम्पत्याला BMC ची नोटीस

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या खारमधल्या घरावर मुंबई महानगरपालिकेने नोटीस जारी केली आहे. घराचं बांधकाम अनधिकृत असल्याच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे.
राणा दाम्पत्याने मातोश्री या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्या अनुषंगाने राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत होत्या. अखेर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली होती. २३ एप्रिलपासून तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली असून निकालपत्राचं काम झालेलं नसल्याने त्यांना ४ मेपर्यंत कारागृहातच मुक्काम करावा लागणार आहे.




