छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानामुळे देश आणि धर्म सुरक्षित: प्रशांत जगताप

कर्वेनगर : छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलीदानामुळेच आपला देश आणि धर्म सुरक्षित होता आहे आणि राहील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. मोरया मित्र मंडळ कर्वेनगर यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जंयती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जंयती निमित्त मोरया मित्र मंडळाचा वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व, निबंध स्पर्धा तसेच ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धातील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक केदार मारणे यांनी केले होते.
या प्रसंगी मोरया जीवन गौरव पुरस्कार सामाजिक , शिवकार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेले सुरेश नाशिककर यांना मोरया रत्न पुरस्कार (कला, सांस्कृतिक)प्रसिद्ध तबलावादक गोपाळ धुमाळ यांना देण्यात आला. तर १२१ सायकल राईड करून पर्यावरण विषयक जनजागृती , तसेच वृक्षारोपण, जुन,जुलै,ऑगस्ट महिन्यात बीजारोपण तसेच कपडे वाटप अशी कामगीरी करणाऱ्या ब्राईट फ्युचर क्लब पुणे यांना व दुर्गम भागात जाऊन बॅल्केट वाटप, खेडोपाडी जाऊन शालेय साहित्य वाटप दरवर्षी सुमारे ५० हजार वह्या वाटप करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉय युनियनला मोरया भुषण पुरस्कार देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी बद्दल उपनिरीक्षक आनंद राठोड , जलतरण खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बद्दल जलतरणपटू गीता मालुसरे यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

यावेळी मोरया मित्र मंडळ कर्वेनगर वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व, निबंध स्पर्धा तसेच ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये वकृत्वस्पर्धा प्रथम क्रमांक सोहम वाघस्कर, द्वितीय क्रमांक गौरवी राऊत , तृतीय क्रमांक प्रणीती पवार तर निंबध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नेहा शिवलिंग माळी , द्वितीय क्रमांक अस्मिता लहु मेंढे, तृतीय क्रमांक अथर्व लक्ष्मण ननावरे, चतुर्थ क्रमांक रोषणी भिकाजी निकम यांना पारितोषिक मिळाले .
ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संजीवनी केंगार, द्वितीय क्रमांक गौरवी राऊत प्रीती बालगुडे हिने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे आणि जयश्री मारणे यांच्या हस्ते झाला संपन्न झाला.



यावेळी मंडळाचे अध्यक्ष सागर शिगवण , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष डॉ सागर बालवडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खडकवासला अध्यक्ष कुणाला वेडे, कोथरूड कॉंग्रेस अध्यक्ष विजय खळदकर ,खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्षा मधुरा भेलके, प्रथमेश मारणे, आनंद तांबे , विष्णू सरगर, गजानन कड, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदिनी पाणेकर ,तेजस्विनी शिंदे, रेश्मा बराटे ,लता पवार, अनंता केंडे, संजय फाटक, अमृत मारणे , विनायक भरम, गणेश गायकवाड, राकेश शेंडगे,अथर्व भरम,सागर शिंदे, रोहिदास जाधव, ब्रम्हानंद टाक उपस्थित होते.
सुत्रसंचलन रोहित दानवले यांनी केले






