भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वारजेत सेवा सप्ताहाचे आयोजन..

सचिन दशरथ दांगट यांच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन
वारजे : भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा ६४ वा वाढदिवस वारजे माळवाडी परिसरात सेवा सप्ताहाचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे. कोणतेही बोर्ड , बॅनर , केक , बुके यावर खर्च न करता समाजोपयोगी उपक्रम करून आपला वाढदिवस साजरा केला जावा या दादांनी केलेल्या आवाहनानुसार वारजे माळवाडी परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत
या सेवासप्ताहातंर्गत वारजे माळवाडी परिसरातील विद्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेडिंग मशीन आणि सॅनिटरी नॅपकिन मशीन इन्सिनरेटर मशीन बसविण्यात येणार आहेत. या १ लाख रूपये किमतीच्या मशीन्सचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांचे हस्ते ऊदघाटन करण्यात आले .
यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, रोटरी क्लब प्रेसीडेन्ट डॉ .सिमरन जेठवाणी, इंडोटेकचे भाऊसाहेब जंजिरे, एस.एम.खान, पोर्णीमा देशमुख, पोर्णिमा लुणावत , कृष्णा देशमुख , नितु सिंग , सहकार आघाडी उपाध्यक्ष निळकंठ शेळके , सरचिटणीस ॲड.संदीप शिंदे , सरचिटणीस अजित देशपांडे, उपाध्यक्ष जयंत नरूटे , सरचिटणीस शंतनु खिलारे, ऋषिकेश रजावत , सिध्दार्थ तुळपुले, व्यंकटेश दांगट यांच्यासह भाजपा पुणे शहर पदाधिकारी , नगरसेवक , नगरसेविका आणि कार्यकर्ते ऊपस्थित होते .
वारजे परिसरातील काही विद्यालयांमध्ये या मशीन बसविण्यात येणार असुन येणारे काळात प्रभाग क्रमांक ३४ वारजे कोंढवे -धावडे मधील प्रत्येक विद्यालय , महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेडिंग मशीन ज्यातुन विद्यार्थीनींना पॅड मिळतील आणि ते पॅड वापरून झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपयुक्त असणा-या इन्सिनरेटर मशीन बसविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक मनिषा सचिन दांगट आणि भाजप सहकार आघाडी पुणे शहराध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी सांगितले. वरील मशीन्ससाठी अर्थसहाय्य रोटरी क्लब पुणे आणि सचिन दांगट मित्र परिवाराचे वतीने करण्यात आले .




