पुणे शहर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची किरण दगडे पाटील यांच्या निवासस्थानाला भेट

निर्मला सीतारमण यांनी घेतला महाराष्ट्रीयन भोजनाचा आस्वाद

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बावधन  येथे भाजपाच्या विविध मोर्च्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या संवाद कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बावधन मध्ये सीतारामन यांचे भव्य रॅली काढून नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

या रॅलीत मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागरिकांनीही गॅलरीत येत सीतारमण यांचे स्वागत केले. यावेळी सीतारमण यांनी किरण दगडे पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. बावधनच्या सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही दगडे पाटील यांच्या निवासस्थानी करण्यात आली होती. आपल्याला महाराष्ट्रीयन जेवण आवडल्याची भावना सीतारमण यांनी यावेळी व्यक्त केली.

Img 20220923 wa0124

बावधनमधील सुर्यदत्ता कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसभा प्रवास योजना’ व खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत भाजपाच्या विविध मोर्च्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या संवाद कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना सीतारमण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, राहुल कुल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा सचिव अविनाश मोटे, कार्यक्रमाचे प्रमुख बाबा जाधवराव, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस माऊली शेळके, युवा मोर्चा सचिव गणेश वरपे आदी उपस्थित होते.

Img 20220910 wa0003

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये