पुणे शहर

पुणे महापालिकेचे विसर्जन करण्याचा ब्राह्मण महासंघाचा इशारा


पुणे : पुणे महापालिकेच्यावतीने गणेशमूर्ती विसर्जनासाठी कचऱ्याचे कंटेनर वापरात आणत असल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाच्यावतीने करण्यात आला असून उद्या (सोमवारी ता.२४) सकाळी या निषेधार्थ ब्राह्मण महासंघाच्या वतीने महापालिकेच्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

या संदर्भात ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे म्हणाले,  गणेशोत्सवाच्या आधीपासून आम्ही वारंवार सुचना करून व सर्व स्तरावरून सुचना येऊन देखील गणपती विसर्जनाची योग्य व्यवस्था करण्यात पुणे महानगरपालिकेला अपयशी ठरत आहे. कचऱ्याचे कंटेनर विसर्जनासाठी पाठवून आता हद्द पार झाली आहे. सर्व हिंदू धर्मातील गणेश भक्तांच्या भावना महापालिका दुखवत आहे.

या महानगरपालिकेला आता विसर्जन करायची खरच वेळ आली आहे. ब्राह्मण महासंघ उद्या महानगरपालिका मुख्य इमारत येथे सकाळी ११.३० वाजता (प्रतिकात्मक विसर्जन) आंदोलन करणार आहे. सर्व पुणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासन व प्रतिनिधींना जाणीव करून देण्याच्या कामात ब्राह्मण महासंघाची साथ द्यावी .

महानगरपालिकेने ५ व्या दिवसाच्या गणपती विसर्जनापुर्वी व्यवस्था न केल्यास सर्व नागरिकांना आवाहन करून सर्व मुर्ती महानगरपालिकेच्या आवारात ठेवण्यात येतील. असा इशाराही दवे यांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये