महाराष्ट्र

नाशिक बस दुर्घटना : मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए टेस्ट करणार

नाशिक : नाशिक येथील बस दुर्घटनेतील मृतामधील फक्त दोन प्रवाशांची ओळख पटलेली असून इतर प्रवाशांची ओळख पटविणे मुश्किल असल्याने त्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी सांगितले. 

Img 20220924 182515 453

इतर फॉरेस्निक टेस्ट ही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. आताच्या घडीला पोस्टमार्टम करून त्यांच्या ओळख करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. या व्यतिरिक्त आपण प्रशासन मार्फत प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी टोल फ्री नंबर देण्यात आला आहे. दरम्यान बस आग लागल्याच्या घटनांसंदर्भांत कठोर पाऊले उचलण्यात येऊन यासाठी पोलीस प्रशासन आणि आरटीओ आणि इतर स्थानिक प्रशासन सोबत चर्चा करणार असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी सांगितले. 

Fb img 1647413711531

फ्युएल टॅंकमध्ये स्फोट

बस स्लीपर कोच होती. ती यवतमाळहून मुंबईकडे चालली होती. नाशिकहून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रेलरशी समोरासमोर धडक होऊन ट्रेलरच्या फ्युएल टॅंकमध्ये स्फोट होऊन बसला आग लागली. सद्यस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 27 लोकांना उपचार सुरु असून एका प्रवाशाला मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आले आहे. दरम्यान दाखल केलेल्या रुग्णांना किरकोळ दुखापत व फ्रॅक्चर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयामध्ये स्थानिक आमदार, पदाधिकारी, शासकीय अधिकारी देखील मोठ्या संख्येने असून जिल्हाधिकारी गंगाधरन डी हे स्वतः देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये