NMIMS चा ‘सोबस वेंचर्स’सोबत सामंजस्य करार; विद्यार्थी स्टार्टअपला मिळणार प्रोत्साहन

मुंबई : संशोधन, नाविन्यपूर्णता आणि उद्योजकता केंद्र होण्याचे उद्दीष्ट पुढे नेत, NMIMS ने सोबस वेंचर्ससोबत सामंजस्य करार केला आहे. NMIMS शिरपूर कॅम्पस आणि सोबस वेंचर्समध्ये हा करार झाला आहे. बहुउद्देशीय केंद्र (सेंटर फॉर एक्सलन्स- सीईओ) निर्मितीकरीता सामंजस्य करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना स्टार्टअप निर्मिती आणि कारकिर्दीला चांगली सुरूवात करून देण्यासाठी योग्य आराखड्यासमवेत उद्योजकता अनुभव उपलब्ध करून देण्यावर “सीईओ”चा भर असणार आहे.
NMIMS प्रो. व्हाईस चान्सलर, डॉ. म्हैसकर आणि सोबस वेंचर्सचे संचालक दिग्विजय चौधरी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. शिरपूर येथील NMIMS मुकेश पटेल टेक्नॉलॉजी पार्क हे एसव्हीकेएमचे ऑफ-कॅम्पसचे डीम्ड-टू-बी विद्यापीठ आहे.
सोबस वेंचर्स स्टुडिओ प्रा. लि. विषयी थोडक्यात
सोबस हे IITians द्वारे स्थापना करण्यात आलेले आणि सामाजिक व्यवसायाला गती देण्यासाठी चालविण्यात येणारे एक व्यासपीठ आहे. व्यवसायाला सामाजिक हितासाठी वापरण्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. हे प्रभावशाली उद्योजक आणि आशादायी सामाजिक स्टार्टअप्सना एंड-टू-एंड इकोसिस्टमद्वारे नाविन्यपूर्ण, स्थापना आणि चालना देण्यास सक्षम करते.

एनएमआयएमएस शिरपूर कॅम्पसविषयी
एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस, मुकेश पटेल टेक्नॉलॉजी पार्क, शिरपूर कॅम्पस हे नवी दिल्लीतील ऑल इंडिया टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) तर्फे मंजूरी देण्यात आलेले एकात्मिक कॅम्पस आहे. एसव्हीकेएमचे एनएमआयएमएस शिरपूर कॅम्पस हे एनएमआयएमएस’चे (डीम्ड-टू-बी-युनिव्हर्सिटी) ऑफ-कॅम्पस आहे. ‘एनएमआयएमएस’ला एमएचआरडी/युजीसी, (एमओई) तर्फे ग्रेडेड ऑटोनॉमी रेग्युलेशन्स 2018 अनुसार अ-श्रेणी विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. एनएमआयएमएस मुंबई कॅम्पसला अ+ (3.59 चा सीजीपीए) दर्जा आणि एनएएसी मान्यता आहे. नदीकाठी वसलेले देखणे एनएमआयएमएस, शिरपूर कॅम्पस शैक्षणिक श्रेष्ठतेची मोठी परंपरा राखून आहे. उद्योग-केंद्रित शैक्षणिक कार्यक्रम आणि उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये विद्यार्थांना आत्मसात करता यावीत, यासाठी उत्कृष्ट संशोधन पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. इथे अभियांत्रिकी, औषधशास्त्र (फार्मसी), कृषी आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित कार्यक्रम उपलब्ध आहेत. या विद्यापीठामध्ये बहुविध शाखा असल्याने सर्व विद्यार्थ्यांना आंतरशाखीय शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील योग्य ज्ञान आणि अनुभव देता यावा, यासाठी अतिशय काळजीपूर्वकरीत्या प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या मागण्या आणि अपेक्षा समजून घेता याव्यात यासाठी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी नियमितपणे संवाद साधला जातो तसेच उद्योग इंटर्नशिप कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या खेरीज, विद्यार्थ्यांना आधुनिक अभ्यासक्रमाचा मार्ग खुला व्हावा, यासाठी विद्यापीठाने उद्योगातील प्रमुख असेलेल्या आयबीएम आणि कोर्सेरासारख्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंचासोबत करार केला आहे.



विद्यापीठात सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण देण्यात येते. प्रत्येक विद्यार्थाचा सर्वांगीण विकास व्हावा, यावर विद्यापीठाचा भर आहे. एनएमआयएमएस शिरपूर हे निवासी कॅम्पस आहे. येथे विद्यार्थ्यांना वर्गाच्या चार भिंतींच्या पलीकडील शिक्षणाच्या अनेक संधी मिळतील याची खातरजमा करून घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी स्वयं-प्रेरणेने आयुष्यभरासाठी शिकत राहता यावे यासाठी पुरेशा संधी आणि संसाधने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, हे विद्यापीठाचे तत्त्व आहे. उद्योग, उच्च शिक्षण किंवा उद्योजकता क्षेत्रात विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी आणि मिळवलेले यश हे विद्यापीठाने घेतलेल्या कष्टाचे प्रतिबिंब आहे.



“सोबससह केलेल्या भागिदारीचा फायदा अभ्यासक्रम, कार्यशाळा तसेच प्रशिक्षण कार्यक्रमासाठी होईल. गोल्बल लिंकेजेस, प्रोग्राम, अभ्यासक्रम निर्मिती आणि विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने NMIMS ने अनेक उपक्रम केले आहेत. सोबस समवेतच्या या भागीदारीविषयी आम्ही सकारात्मक आहोत. ही भागिदारी शक्तिशाली नाविन्यपूर्णता आणि उद्योजकक्षम कॅम्पस व्यवस्था उभारण्याचे आमचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सहाय्य करेल.”
– डॉ. शरद म्हैसकर, प्रो व्हाईस चान्सलर, NMIMS.
“भारत हा जगभरात सर्वाधिक स्टार्टअप असलेला तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आजच्या तारखेत भारतात आम्हाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास संधी दिसत आहेत. त्याचबरोबर जगभरात युवकांचा देश अशी भारताची ओळख आहे. आपल्याकडील ५० टक्के लोकसंख्या २५ वयोगटाखालील आहे. तरूण देश म्हणून आपल्या महत्त्वाकांक्षा मोठ्या असल्या तरीही संधी तोकड्या दिसतात. खऱ्या अर्थाने कणखर देश म्हणून आपण उदयाला येत आहोत. NMIMS ला सहाय्य, सामाजिक उद्योगांवर लक्ष केंद्रीत करून प्रदेश-केंद्री स्टार्टअप व्यवस्था म्हणून उदयाला येणे हे उद्दीष्ट आहे. NMIMSला मदत करण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटीही देण्याचे आमचे धोरण आहे.”
– दिग्विजय चौधरी, संचालक, सोबर्स व्हेंचर स्टुडिओ.



