पुणे शहर

लक्ष्मी दुधाने,स्वप्नील दुधाने यांच्याकडून स्वच्छ्ता दूतांना दिवाळी भेट

कष्टाची दखल घेतली जात असल्याने कर्मचारी भावनिक

कर्वेनगर : कर्वेनगर परिसरातील आरोग्य दुत असणाऱ्या महापालिकेचे सफाई कर्मचारी, कचरावेचक कर्मचारी, कचरा घंटागाडीवरील कर्मचारी या सर्व सेवकवर्गास माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या वतीने दिवाळीनिमित्त दिवाळी भेट देण्यात आली.

दरवर्षी लक्ष्मी दुधाने व स्वप्नील दुधाने यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. आपल्या कष्टाची, कामाची दखल घेत आपली दिवाळी गोड करण्यासाठी प्रयत्न केला जातो हे पाहून या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कर्मचारी वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला मिळाला. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल याठिकाणी हा आगळावेगळा कार्यक्रम संपन्न झाला.

Fb img 1647413711531

या सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात कसलीही पर्वा न करता संपुर्ण परिसर स्वच्छ ठेवत कचरा उचलण्याचे काम अविरतपणे चालु ठेवले होते. त्यांनी केलेल्या स्वच्छतेच्या कामामुळे नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत झाली होती. हे त्यांचे काम सदैव लक्षात राहण्यासारखे आहे. त्याच प्रमाणे नियमित परिसराची सफाई करून हे कर्मचारी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. या स्वच्छता दूतांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्यांची दिवाळी आनंदी जावी म्हणून या उपक्रमाचे गेली ११ वर्ष आयोजन करत असल्याचे स्वप्नील दुधाने यांनी सांगितले.

Img 20221012 192956 045
Fb img 1666329573887
Screenshot 2022 10 19 10 52 53 83
Img 20221020 wa0232
Img 20221019 143448 4921652329476299347948
Img 20221020 wa00071429831687423321840
Img 20221021 wa0039

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये