पुणे शहर

पुण्यात ड्रेनेज चेंबर साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

पुणे : वाघोली येथील मोझे कॉलेज रस्त्यावर असणाऱ्या एका सोसायटीचे चेंबर साफ करण्यासाठी ड्रेनेजमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेने सफाई कामगारांची सुरक्षितता हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

Fb img 1666329573887

एका सोसायटीचे चेंबर साफ करण्यासाठी दोन कर्मचारी ड्रेनेजमध्ये उतरले होते. मात्र बराच वेळ होऊनही खाली गेलेल्या दोघांचा काही प्रतिसाद न मिळाल्याने वरती असणारा एक कर्मचारी त्यांना शोधण्यासाठी खाली उतरला. मात्र, तो देखील गायब झाला. या घटनेची माहिती पीएमआरडीच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चेंबरमध्ये अडकलेल्या तिघांचा जवानांनी शोध सुरू केला. अगदी काही वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांचा शोध घेत त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

Img 20221021 wa0039

वाघोली येथील बायफ रोडवरील सोलासीय सोसायटीच्या चेंबरमध्ये काम करणाऱ्या नितीन प्रभाकर गोड (वय ४५ वर्षे), गणेश भालेराव (वय २८ वर्षे), सतीशकुमार चौधरी (वय ३५ वर्षे) (रा. वाघोली ) या तिघांचा काम करत असताना चेंबर मध्येच गुदमरून मृत्यू झाला असल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाचे विजय महाजन, अक्षय बागल, मयूर गोसावी, चेतन समशे, तेजस सागरे, नितीन माने, संदीप शेळके, अभिजीत दराडे, विकास पालवे यांच्या टीमकडून शोध घेण्यात आला. घटनास्थळी लोणीकंद पोलिसांचे पथकही आहे.

Img 20221019 143448 4921652329476299347948
Img 20221020 wa00071429831687423321840
Img 20221021 wa00011331728156984263886
Img 20221020 wa0232
Screenshot 2022 10 19 10 52 53 83
Img 20221012 192956 045

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये