रस्त्यावर कोसळलेली सिमाभिंत किरण बारटक्के यांच्या पाठपुराव्याने हटली ; नागरिकांची गैरसोय दूर..

वारजे : वारजे माळवाडी मधील लिबेरो सोसायटी येथील सिमाभिंत मुसळधार पावसामुळे कोसळून रस्ता बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. सोसायटीतील नागरिकांनी माजी नगरसेवक व भाजपचे पुणे शहर सचिव किरण बारटक्के यांच्याशी संपर्क करून माहिती दिल्यानंतर बारटक्के यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून रस्ता मोकळा केल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली.
सध्या शहरात रोज मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन दिवसांपूर्वी अशाच मुसळधार पावसामुळे वारजे माळवाडी मधील लिबेरो सोसायटी येथील सीमा भिंत कोसळून नुकसान झाले होते. या भिंतीचा भाग रस्त्यावर पडल्याने येथील रस्ता बंद झाला होता त्यामुळे नागरिकांना येजा करताना त्रास सहन करावा लागत होता.

येथील नागरिकांनी माजी नगरसेवक किरण बारटक्के यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. बारटक्के यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाला याची माहिती देऊन पाठपुरावा केल्यानंतर पालिकेकडून रस्त्यावरील भिंतीचा कोसळलेला भाग बाजूला करून रस्ता मोकळा केला. रस्ता मोकळा करून सुरू करण्यात आल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली.



























