पुणे शहर

निंबाळकर तालीम मंडळातर्फे
कुंजवन संस्थेला धान्याची मदत


पुणे: गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा दानधर्म करण्याचा निर्णय सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम गणेश मंडळाने घेतला. आणि त्यानुसार दोनशे किलो तांदूळ आणि पन्नास किलो तूरडाळ कारी (भोर) येथील कुंजवन सामाजिक सेवा संस्थेला दिले.

यंदा गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच करण्यात आली आहे. मंदिरातच अध्यक्ष सुरेशराव पवार यांच्या हस्ते कुंजवन सामाजिक सेवा संस्थेचे माधवराव गोडबोले यांच्याकडे धान्याची पोती सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष गणेश बुचडे पाटील, खजिनदार अशोक कोंढाळकर, रचना शहा उपस्थित होते.

या दानधर्माच्या उपक्रमासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. विधायक कामाला नेहमीच लोकांचे सहकार्य मिळते याचा अनुभव या उपक्रमाच्या निमित्ताने परत मिळाला असे सुरेशराव पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये