महाराष्ट्र

“यांचे महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली दबलं गेलं”, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अवमान महाराष्ट्रात होत आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा आहे. तुम्ही त्यांना अटी घालता, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केला आहे.

महाविकास आघाडीच्या मोर्चापूर्वी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मोर्चाला लावण्यात आलेल्या अटी-शर्तीवरून राऊतांनी शिंदे सरकारचा समाचार घेतला आहे. “हे नाही करायचं, इथे उभं राहायचं नाही, स्पीकर लावायचं नाही, भाषण लिहून द्या आता. पण, आता आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही. तसेच, यांचे महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली दबलं गेलं आहे,” अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.

“संयुक्त महाराष्ट्रातील लढ्याचे मोर्चे पाहिले आहेत. त्यांना महाविकास आघाडीचा मोर्चा पाहून तेव्हाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण, तेव्हाचे मोर्चे हे महाराष्ट्र प्रेमाणे भारवलेले होते. आताही समस्त महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा निघाला आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये