भाजप भटके विमुक्त आघाडीकडून अजित पवारांविरोधात आंदोलन

पुणे : भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी पुणे शहराच्या वतीने धर्मवीर स्वराज्यरक्षक श्री.छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज पुतळा, डेक्कन येथे छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून अजित पवार यांचा भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी च्या वतीने निषेध केला , याप्रसंगी भटके विमुक्त आघाडीचे शहर अध्यक्ष , राजेश धोत्रे यांनी यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज ,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी असंख्य मरणयातना सहन करुन बलीदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असणारे मावळे हे बारा बलुतेदार, अठरा पगड जातीतील होते, अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केले त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अन्यथा हे आंदोलन असेच सुरू राहील.
याप्रसंगी, भटके विमुक्त आघाडी चे अध्यक्ष राजेश दत्तू धोत्रे , बंडु जाईभाई , सुरज पवार , संजय सुपेकर, देविदास बिनवडे, सत्यसिंग परदेशी , नामदेव गुट्टे, रामदास विटकर , कुणाल वैद्य , बंटी जाधव, पदाधिकारी उपस्थित होते




