पुणे शहर

चित्रा वाघ यांचे वादग्रस्त वक्तव्य; चंद्रकांत पाटलांची केली महात्मा ज्योतिबा फुलेंशी तुलना

पुणे : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केली आहे. पुण्यातील हेमंत रासने यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी ही तुलना केली. राज्यात मागील काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून वातावरण तापलं होतं.

भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, “तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे”. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तुमच्या नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही ही विधानं करत आहात पण त्यात महापुरुषांना मध्ये ओढू नका असं मिटकरी यांनी म्हटलं आहे. राज्यात मागील काही दिवसांपूर्वी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून वातावरण तापलं होतं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या या नव्या वक्तव्याने पुन्हा वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये