सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं ‘या’ दिवशी होणार उद्घाटन; पुणेकरांनाही होणार लाभ

मुंबई : सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगितले जात आहे. सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस पुणे मार्गे धावणार असल्याने पुणेकरांना देखील या वंदे भारत एक्सप्रेसचा लाभ होणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकातून पुणे-सिंकदराबाद व सोलापूर-मुंबई या दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. त्यापैकी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन 10 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलस मुंबई या ठिकाणी होणार आहे. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजित आहे. याबरोबरच या दिवशी साईनगर शिर्डी एक्स्प्रेसचे उद्घाटनही पंतप्रधान करणार असल्याची माहिती चर्चेत आहे.
असे असेल वेळापत्रक
वंदे भारत एक्सप्रेस सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सोलापूरहुन सुटेल अन सकाळी नऊ वाजता पुण्यात दाखल होईल यानंतर मग ही रेल्वे बारा वाजून 30 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. त्याच दिवशी सायंकाळी ही रेल्वे मुंबईहून सोलापूरच्या दिशेने रवाना होईल. 4 वाजून 10 मिनिटांनी मुंबईहून निघाल्यानंतर सात वाजून 30 मिनिटांनी ही रेल्वे पुण्यात दाखल होईल अन मग रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी ही रेल्वे सोलापूरला पोहोचेल. दरम्यान मुंबईहून बुधवारी आणि सोलापूरहून गुरुवारी ही रेल्वे धावणार नाही.
राम मूर्ती निर्माणासाठी नेपाळ मधून दोन विशाल शिळा अयोध्येला आणल्या जात आहेत. पहा व्हिडिओ…👇




