कोरोनामुळे एक पालक गमावलेल्या ६० बालकांना बालसंगोपन योजनेचे आदेश; पुणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने कोथरूडमध्ये “शासन आपल्या दारी”

पुणे : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुणे कार्यालया मार्फत आज दिनांक १६/०२/२०२३ रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प कोथरूड पुणे येथे आयोजित केलेल्या मिशन वात्सल्य अंतर्गत “शासन आपल्या दारी” कार्यक्रमात कोरोना मुळे एक पालक गमावलेल्या ६० बालकांना बालसंगोपन योजनेचे आदेश करण्यात आले
सदर कार्यक्रमात बाल कल्याण समिती क्र १ च्या अध्यक्षा .डॉ.राणी दुष्यंत खेडिकर सदस्य आनंद शिंदे,ॲड.पूर्वी जाधव, शामलता राव, वैशाली गायकवाड, श्री सुरेश टेळे बाल विकास प्रकल्प अधिकारी कोथरुड प्रकल्प (नागरी), रुपल साळुंके (संरक्षण अधिकारी- संस्थात्मक) जिल्हा बाल संरक्षण कक्ष पुणे, विद्या पाटील (माहिती संकलक बालकल्याण समिती पुणे, प्रकल्पातील पर्यवेक्षिका श्रीमती विजया पाटील व श्रीमती पायल हरदे , तसेच प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका यांचे सहकार्यामुळे ६० एकपालक गमावलेल्या बालकांचे बाल संगोपनचे आदेश पूर्ण केले.




