पुणे शहर

पुण्यातील क्रिकेट खेळाडूंनी पार पाडले सामाजिक कर्तव्य ; सामाजिक संस्थेस दिले खेळाचे साहित्य भेट..

कोथरूड : भटक्या विमुक्त समाजातील मुलांचे संगोपन करणाऱ्या यमगरवाडी सेवा प्रकल्प, उस्मानबाद या संस्थेस पुण्यातील क्रिकेट खेळाडूंनी खेळाचे साहित्याची मदत देत सामाजिक कर्तव्य पार पाडले.

यमगरवाडी सेवा प्रकल्प, उस्मानबाद ह्या संस्थेचे सदस्य आज कोथरूडमधील आयडियल मैदानावर उपस्थित होते. आश्रमशाळा काय आहे, भटक्या विमुक्त समाजाच्या मुलांचे संगोपन ही संस्था कशी करते. ह्या बदल सविस्तर माहिती संस्थेचे राजभाऊ गजरे यावेळी मैदानावरील उपस्थित खेळाडूंना दिली.

यावेळी चार बॅट बॉल , रॅकेट शटल, पाच शूज, पाच वाफेच्या मशीन, पाच फुटबॉल व इतर खेळाचे साहित्य खेळाडूंकडून या संस्थेस देण्यात आले. संस्थेचे राजभाऊ गजरे ह्यांनी सर्व 40+ पुणे क्रिकेट संस्था, एस.एम.व्ही 1990 ग्रुप,आयडियल स्पोर्ट्स , कर्णवीर प्रतिष्ठान, युनायटेड संघ ह्यांचे आभार मानले.

राजाभाऊ गजरे म्हणाले, कोथरूड मधील खेळाडूंनी अशा पद्धतीचे सहकार्य केल्याने यमगरवाडी प्रीमियर लीग सुद्धा चांगली होणार. जी मुले अनाथ आहेत, त्यांच्या करिता आज पुणे टेनिस क्रिकेट च्या आजी माजी खेळाडूंनी जे सहकार्य केले त्या बद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. खेळता खेळता समाजाचे आपण काही देणे लागतो हेच या कर्तव्यातून खेळाडूंनी दाखवून दिले आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये