नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात : राज ठाकरे

नाशिक : नोटबंदीसारखे (Note Ban) निर्णय देशाला परवडणारे नसतात, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन हा निर्णय झाला असता तर ही वेळ आली असती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली. यावर राज ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, “हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन हा निर्णय झाला असता तर ही वेळ आली असती. कधीही गोष्ट आणायची, कधीही बंद करायची, त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या तेव्हा त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा एटीएममध्ये जात आहेत की नाहीत हे देखील पाहिलं नव्हतं. हे असले निर्णय परवडणारे नसतात देशाला. आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे, परत तुम्ही नवीन नोटा आणणार, असं सरकार चालतं का? असे प्रयोग होतात का?”


