कोथरुड

श्रमिक वसाहतीत स्वच्छ परिसर अभियान

कर्वेनगर : ज्ञानदीप श्रमिक वसाहत मित्र मंडळ व
स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  कर्वेनगर भागातील श्रमिक वसाहत परिसरामध्ये आपला परिसर स्वच्छ परिसर या संकल्पनेतून कचरा मुक्त अभियान राबविण्यात आले.

यावेळी नागरिकांना घरातील ओला व सुका कचरा येणाऱ्या स्वच्छ सेवकांकडे देण्याचे आवाहन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संतोष वरक यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. या अभियानात तानाजी कसबे, मोनाली तुपे, संध्या बेरोळे, सुप्रिया वाघमारे , स्वाती पाटील, कौसर पटेल आदी सहभागी होते.

सध्या कोरोना च्या संकट काळात स्वच्छता फार महत्वाचा विषय असून त्याबाबतही या अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली. तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Screenshot 2020 09 17 12 12 14 79
Screenshot 2020 09 17 12 14 54 08
Screenshot 2020 09 17 12 21 24 15

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये