पुणे शहर

पुण्यात आरोग्य विभागाचं धक्कादायक वास्तव

पुणे : जे शहर देशातील सर्वात जास्त कोरोनामुळे बाधित शहरांपैकी एक आहे अशा पुण्यातील आरोग्य विभागातील ४४ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती माजी आयएएस अधिकारी महेश झगडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून दिली  आहे.

झगडे यांनी म्हंटले आहे की , आता हि महामारी गंभीर  होत असतांना मुख्य आरोग्य अधिकारी व शासनाने साथ आटोक्यात आणण्यासाठी म्हणून पाठविलेले  अधिकारी देखील रजेवर गेल्याचे समजत असून दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. या संदर्भात शासनाने तातडीने दखल घेणें अत्यावश्यक असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

कोरोना संसर्गाने पुणे शहरात कहर केला असताना एका निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याने केलेल्या या पोस्ट मुळे खळबळ उडाली आहे. शहरात कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र आरोग्य विभागाकडे पुरेशे मनुष्यबळच नसेल तर ते कसे शक्य होणार ते या पोस्ट च्या मध्यामतून पुढे आले आहे. आता या  संदर्भात शासन काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे. आरोग्य विभागाकडे पूर्ण क्षमता नसेल तर साथ आटोक्यात येणार कशी असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये