पुणे शहर

व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीत दीड हजार सायकलपटुंचा सहभाग; पुणे पोलिसांचा पुढाकार

पुणे – समाजातील वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी सर्वांनीच जागरूक होणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती व प्रबोधनाची गरज असून पुणे पोलिसांच्या वतीने व्यसनमुक्ती या विषयावर मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज असल्याचे मत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी व्यक्त केले. पुणे शहर पोलिसांच्या वतीने परिमंडळ 4 विभागात व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त रितेश कुमार बोलत होते.

Img 20230625 wa0099
सायकल रॅलीमध्ये सहभागी सर्वात कमी वयाच्या आरोही संदीप गायकवाड (वय 9 ) व प्रथम ठक्कर (वय 10) यांचा पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमाला अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, या उपक्रमाचे संयोजक पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, साहेब पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्यासह परिमंडळ 4 मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी कर्मचारी तसेच सायकल प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक व्यसनमुक्ती दिनानिमित्त पुणे शहर पोलिसांच्या वतीने परिमंडळ चार विभागात पोलीस उपयुक्त शशिकांत बोराटे यांच्या संकल्पनेतून व्यसनमुक्ती जनजागृती अभियान सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच नागरिक यांचे व्यसन विरोधी विचार या विषयावर मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्था तसेच इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती व प्रबोधन सुरू आहे. त्यासाठी निबंध, चित्रकला व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पथनाट्यसह विविध उपक्रमातून व्यसनाचे धोके समजावून सांगण्यात येत आहेत.

Img 20230625 wa0100
रॅलीमध्ये सहभागी झालेले नागरिक, पोलीस अधिकारी, पत्रकार, महिला

व्यसनाधीनतेमुळे वाढती गुन्हेगारी तसेच इतर सामाजिक प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी या गंभीर विषयावर पुणे पोलिसांच्या वतीने आगामी काळात मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी यावेळी दिली. यानिमित्ताने रविवारी सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आगाखान पॅलेस येथून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये पुणे शहर पोलिसांसह सनराईज सायकलिंग ग्रुप तसेच पुणे पुणे शहरातील सायकल प्रेमी असे सुमारे दीड हजार सायकलपटू जनजागृती रॅलीत सहभागी झाले होते. येरवडा, विश्रांतवाडी, खडकी, चतुर्शिंगी विभागातून निघालेल्या या रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालय शिवाजीनगर या ठिकाणी करण्यात आला.

Fb img 16837376233493064729888638918603


मुक्तांगण संस्थेचे निहाल हसबनीस, पुणे महापालिका सायकल क्लबचे नरेंद्र साळुंखे, सायकल प्रेमी डॉ.सुभाष कोकणे, डॉ.सुरेखा कोकणे यांनी मनोगत व्यक्त केले. या सायकल रॅलीमध्ये सहभागी सर्वात कमी वयाच्या आरोही संदीप गायकवाड (वय 9 ) व प्रथम ठक्कर (वय 10) यांच्यासह सर्वात ज्येष्ठ वयाचे कर्नल आपटे (वय 80) यांचा सायकल रॅलीतील सहभागाबद्दल पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. पुणे शहरातील एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत व्यसनमुक्ती विषयी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक देव यांनी तर आभार अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये