पुणे जिल्हा
समृद्धी महामार्गावरील अपघातात मृतांमध्ये पुण्यातील तिघांचा समावेश

पुणे : समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा जवळ नागपूर पुणे या विदर्भ ट्रव्हल बसला झालेल्या अपघातात निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे शिक्षकासह त्यांच्या पत्नी व मुलीचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात कैलास गंगावणे (48), त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय 38) आणि मुलगी सई गंगावणे (वय 20) यांचा मृत्यू झाला. कैलास गंगावणे त्यांच्या मुलाची नागपूर येथील सेवा विधी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया करून मुलाला तेथे सोडून परत येत होते. हे तिघेजण माघार येत असताना सिंदखेड राजा येथे बस अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर निरगुडकर गावात शोककळा पसरली आहे.










