पुणे जिल्हा

कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन

पुणे : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे ग्रामीण प्रकाश जगताप यांनी सर्व सहाय्यक निबंधकांना दिल्या आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत ॲग्रीस्टॅक काढलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ॲग्रीस्टॅक काढून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Img 20260222 wa00063491038201882637992

जिल्ह्यात अद्याप ८ हजार ७४९ शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. यामध्ये दौंड (११२६), इंदापूर (१२३२), भोर (१०३१), खेड (९३१), मावळ (७९५), शिरूर (६४५), जुन्नर (६४१), बारामती (६०८), हवेली (५९९), पुरंदर (५२४), आंबेगाव (२२९), वेल्हे (१७६), मुळशी (१३४) आणि पुणे (७८) याप्रमाणे आहे.

तसेच ॲग्रीस्टॅक असलेल्या मात्र अद्यापही आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ९ हजार ३८२ असून त्यामध्ये दौंड (१,५९७), इंदापूर (१,४६१), बारामती (९२२), भोर (९००), हवेली (८२१), पुरंदर (७५५), खेड (६४०), शिरूर (६१६), जुन्नर (४६४), मावळ (३७३), वेल्हे (३३८), पुणे (२९१), आंबेगाव (१३६) आणि मुळशी (६८) याप्रमाणे आहेत.

तरी सर्व सहाय्यक निबंधकांना त्यांच्या तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्यादृष्टीने शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. ही बाब शेतकरी कर्जमुक्तीशी संबंधित असल्याने कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावे, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये